WAY TO SUCCESS
समाजहित जपणारे युवा नेतृत्व
श्री. नितीन चंदनशिवे (सर)
सचिव-वसुंधरा पर्यावरण सेवाभावी संस्था खानापूर
(सलग १० वर्षे सामाजिक क्षेत्रातील खडतर वाटचाल)
*विटा प्रतिनिधी -*: पर्यावरण ते स्वच्छ भारत अभियानात उल्लेखनीय योगदान.
सामाजिक क्षेत्रासह पर्यावरण कला क्रीडा सांस्कृतिक तसेच स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण या केंद्र शासनाच्या महत्वकांक्षी उपक्रमांमध्ये सक्रियपणे योगदान देऊन अल्प काळामध्ये आपली सामाजिक वाटचाल गतिमान करणारे गावचे सुपुत्र नितीन चंदनशिवे.
लेंगरे या ग्रामीण भागामध्ये प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण करुन आदर्श महाविद्यालय विटा तसेच शिवाजी विद्यापीठाचे दूरशिक्षण केंद्रांमध्ये पदविका पूर्ण केली आदर्श कॉलेजमधून सन 2012 साली डी.एड ही पदविका घेऊन सन 2012 पासून ते सन 2016 पर्यंत सलग चार वर्षे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लेंगरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भेंडवडे रयत शिक्षण संस्थेची देविखिंडी शाखा व विटा येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळा क्रमांक 14 या चार शाळांमध्ये प्राथमिक व माध्यमिक शिक्षक म्हणून विद्यार्थीप्रिय व सामाजिक भान जपणारे शिक्षक म्हणून उल्लेखनीय काम केले आहे. या दरम्यानच्या काळामध्ये आदर्श शिक्षक आदर्श शिक्षकेतर पश्चिम महाराष्ट्र समाजभूषण असे अनेक पुरस्कार विविध सामाजिक संस्थांच्या वतीने मिळाले सन 2016 पासून पर्यावरण क्षेत्रात काम करण्याचे निश्चित करुन वसुंधरा पर्यावरण सेवाभावी संस्था खानापूर या संस्थेच्या सचिव पदावर काम करायला सुरुवात केली. खानापूर, आटपाडी आणि सांगली जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये संस्थेने यशस्वीपणे वाटचाल सुरू केली, यामध्ये नितीन चंदनशिवे यांचे विशेष योगदान नेहमीच ठळकपणे दिसत होते, अनेक सामाजिक व शैक्षणिक उपक्रमातून गरजूंना मदत करत अनेकांना मदतीचा हात दिला आहे.
सन 2018 पासून स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण करीता विटा नगरपरिषद येथे स्वच्छ सर्वेक्षण जनजागृती विभागामध्ये नगरपालिकेची सार्थ भूमिका घेऊन यशस्वी वाटचाल सुरु केली. स्वच्छ सर्वेक्षण मध्ये विटा शहराचा देशांमध्ये सर्वाधिक स्वच्छ शहर म्हणून पहिला व संपूर्ण देशभरात चौथा क्रमांक मिळवून देण्यात यशस्वीपणे योगदान देण्यात उल्लेखनीय कार्य ठरले.
मागील दहा वर्षापासून या सामाजिक क्षेत्रांमध्ये कार्य करत असताना अनेक संस्था प्रशासनाच्या माध्यमातून तब्बल २१ राज्यस्तरीय पुरस्कार व राष्ट्रीय पुरस्कार, वकृत्व स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये दोन वेळा प्रथम, केंद्रीय बौद्धाचार्य प्रमाणित परीक्षा मध्ये महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक असे घवघवीत यश मिळवले आहे.
सामाजिक क्षेत्रामध्ये काम करताना अनेकदा स्वतःच्या खिशाला चाट लावून लोकांचे दुःख हे आपलं दुःख समजून काम करणारी माणसं फार कमी असतात.,आशा वेळी नितीन चंदनशिवे यांचे काम युवा वर्गाला सतत प्रेरणादायी ठरेल यात तिळमात्र शंका नाही.
Article Made By,
Mr. Prabhudas Baban Kumbhar (Lengere)
7 Comments
Superrrr
ReplyDeleteQuality
ReplyDeleteQuality
ReplyDeleteQuality sir
ReplyDeleteQuality
ReplyDeleteGood job
ReplyDeleteGood job
ReplyDelete